आंबेवाडीतील डांबरीकरण २४ तासात उखडले…. बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार


प्रयाग चिखली( वार्ताहर) : डांबरीकरण केलेला रस्ता अवघ्या २४ तासाच्या आत उखडल्याची घटना करवीर तालुक्यातील आंबेवाडी ते चिखली दरम्यानच्या रस्त्यावर घडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

उखडलेल्या रस्त्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यामुळे घाई गडबडीत त पुन्हा एकदा या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित अभियंत्यांच्या साक्षीनेच दुरुस्ती केली असली तरी हे डांबरीकरणाचा दर्जा निकृष्टच असल्याचे निदर्शनास येत आहे

सध्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी ते यवलूज दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने रस्ता डांबरीकरणाचे काम चालू आहे.

रस्त्यावर प्रचंड रहदारी असताना अत्यंत घिसाड – घाई गडबडीत हे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे.
एका दिवशी एक अर्धी बाजू तर दुसऱ्या दिवशी दुसरी अर्धी बाजू अशाप्रकारे रस्ता करणे अपेक्षित असताना अत्यंत निकृष्ट पद्धतीने घाईगडबडीत या रस्त्याचे डांबरीकरण आटोपण्यात येत आहे. घाई गडबडीमुळे अक्षरशः मातीवर डायरेक्ट डांबरीकरण केले जात आहे परिणामी २४ तासाच्या आतच या रस्त्यावरील डांबरीकरण उघडले. या प्रकाराची नोंद आंबेवाडी येथील स्थानिक नागरिकांनी घेतली व संबंधित ठेकेदाराला घेराव घालून जाब विचारला.

त्यावेळी मात्र ठेकेदाराने पुन्हा घाईगडबडीत आणि साक्षात बांधकाम खात्याच्या अभियंत्याच्या साक्षीनेच पुन्हा एकदा डांबरीकरण करून सारवासारव केली असली तरी हे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट पद्धतीने झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे
याबाबत योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणीही प्रवाशांची व नागरिकांची आहे.

🤙 8080365706