मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची  मनोज जरांगेना विनंती…

सातारा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे  यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचला असून उद्या तो मुंबईच्या वेशीवर धडकण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना मुंबईत न येण्याची पुन्हा एकदा विनंती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना कालही विनंती केली. सरकार सकारात्मक आहे. माझी मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांना विनंती आहे, सरकार निगेटीव्ह असते तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता. म्हणून आंदोलन टाळले पाहिजे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, त्या सापडू लागल्यात. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू आहे. १ लाखापेक्षा जास्त लोक या यासाठी काम करत आहेत. मागास आयोग तीन शिफ्टमध्ये काम करतोय. त्रृटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष अधिवेशनात आरक्षणावर निर्णय घेऊन टिकणारे आरक्षण दिले जाईल.

ते पुढे म्हणाले, आतापर्यंत न झालेले काम सरकार करतेय. त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजेत. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. सरकार ऐकणारे आहे. सर्वांच्या सुट्या रद्द करून सरकार कामाला लागले आहे.पूर्ण टिम कामाला लागली आहे. तुम्ही सरकारला सुचना करू शकता, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना केली आहे.