राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ए वाय पाटील यांची बढती ..

कोल्हापूर प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ए. वाय. पाटील यांनी 2014 पासून जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे . सत्ता नसतानाही त्यांनी पक्षाची मूठ चांगल्या पद्धतीने बांधली, गावागावात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन अजित पवार यांनी त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

याबाबत बोलताना ए.वाय. पाटील म्हणाले मला जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा असे मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सांगितले त्यानुसार त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. पक्ष वाढीसाठी यापुढेही मी जोमाने काम करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.