हळदीचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का….?

हळद  भारतीय मसाल्यांपैकी एक आहे ज्यात एंटी ऑक्सिडेंट्स, एंटीसेप्टीक गुण असतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हळीदीचे सेवन करायलाच हवे. हळद अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.त्वचा आणि केसांसाठी हळद फायदेशीर ठरते. हळदीच्या वापराने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होऊ शतकात.

हळदीचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. हळद चेहऱ्याला लावल्याने त्वचा मऊ, मुलायम राहण्यास मदत होते.  त्वचा आणि केसांसाठी हळद फायदेशीर ठरते. हळदीच्या वापराने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होऊ शतकात. हळदीचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. हळद चेहऱ्याला लावल्याने त्वचा मऊ, मुलायम राहण्यास मदत होते. 

वाढत्या वयात त्वचेवर फाईन लाईन्स आणि सुरकुत्या यायला सुरूवात होते. नंतर वयवाढीची लक्षणं दिसून लागतात. वाढत्या वयात चेहऱ्यावर म्हातारपणाची लक्षणं जाणवू लागतात. हळदीचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांपासून दूर होऊ शकतात. हळदीच्या वापराने त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. हळदीमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते आणि सुरकुत्याही कमी होतात.

दही, लिंबाचा रस आणि हळद व्यवस्थित मिसळून चेहऱ्याला लावा. जवळपास १० ते १५ मिनिटं तसंच लावून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावायला विसरू नका. असं केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स येणार नाहीत.

अनेकजणांची त्वचा संवेदनशील असते. संवेदनशील त्वचा खाज आणि सूज येण्याचं कारण ठरते. जर तुम्हालाही त्वचेच्या समस्या उद्भवत असतील तर हळद आणि एलोवेरा जेल मास्क तुमची मदत करू शकतो. अर्धा चमचा ताज्या एलोवेरा जेलमध्ये हळद मिसळून या मिश्रणाची स्मूद पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटं तसंच ठेवा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा या फेस मास्कचा वापर केल्यास चांगला फरक दिसून येईल.

हळदीत एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी इंफ्लेमेटरी तत्व असतात. ज्यामुळे त्वचेत प्राकृतिक चमक येते आणि चेहरा ग्लोईंग दिसतो. औषधी गुणांनी परिपूर्ण हळदीचा फेस मास्क लावल्याने त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते. हळदीत थोडं दही आणि मध मिसळून ही पेस्ट चेहऱ्याला व्यवस्थित लावा. हा फेस मास्क जवळपास १५ मिनिटं चेहऱ्याला लावलेला राहू द्या. यामुळे स्किन शाईन करत

त्वचेवर सतत पिंपल्स, एक्ने येत असतील तर वेगवेगळ्या क्रिम्स, लोशन आणि उपाय याचा काहीही उपयोग होत नाही. केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक उपाय हळदीचा वापर करा. साधारणपणे तेलकट त्वचेवर पिंपल्स जास्त येतात. हळदीचा फेस पॅक पिंपल्स कमी करण्यास फायदेशीर ठरतो. मुल्तानी मातीत दही, गुलाब पाणी आणि चुटकीभर हळद घालून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यानंतर १५ मिनिटं सुकू द्या. या फेस मास्कमुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.

हळदीत एंटी इंफ्लेमेटरी तत्व असतात ज्यामुळे छिद्र साफ होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त हळदीत एंटी सेप्टीक गुण असतात. ज्यामुळे डाग, जखम होत नाही. बेसन, हळद आणि साय व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्याला लावा. हे मिश्रण जवळपास २० मिनिटं चेहऱ्याला लावून सुकू द्या. त्यानंतर गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुम्हाला फरक दिसून येईल.