शरद पवार गट राष्ट्रवादी महिला कार्यकर्ता मेळावा 23 जानेवारी रोजी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या वतीने महिला कार्यकर्ता मेळाव्याचे मंगळवार 23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता साईक्स एक्सटेन्शन येथील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या महालक्ष्मी व्यापारी सांस्कृतिक हॉल मध्ये आयोजन करण्यात आले आहे.

सदर मेळाव्यास महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्षा रोहिणीताई खडसे या मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कविता म्हेत्रे यांच्यासह जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के.पोवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले व महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने यांनी केले आहे.