गीत रामायणातून कागलमध्ये साकारला प्रभू श्रीरामांचा जीवनपट

कागल (प्रतिनिधी) : महाकवी ग.दि.माडगूळकर आणि संगीतसुर्य सुधीर फडके या प्रतिभावंताच्या अलौकिक प्रतिभेतील गीत रामायणातून कागलमध्ये प्रभू श्रीरामांचा जीवनपट साकारला. संयोजक प्रसाद कुलकर्णी प्रस्तुत “स्वरसांगाती” आजरामर गीत रामायण हा विशेष कार्यक्रम रामभक्त कागलवासियांच्या उच्चांकी गर्दीच्या साक्षीने उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.त्यांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

येत्या 22 तारखेस अयोध्या येथे प्रभु श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील श्रीराम मंदिरसमोर  हा संगीत सोहळा पार पडला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांच्या संकल्पनेतून व श्रीराम मंदिर लोकोत्सव समितीच्या वतीने तीन दिवसीय दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले आहे.खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

गीत रामायणमधील श्रीराम कथेच्या अनुषंगाने २५ ते ३०हून अधिक गीतांचा या कार्यक्रमात समावेश होता.सायंकाळच्या शांत व प्रसन्न वातावरणात श्रीराम मंदिरसमोर झालेल्या सोहळ्याने रसिकांची मने तर जिंकलीच व साक्षात प्रभू श्रीराम अवतरल्याचा भास झाला. खऱ्या अर्थाने वातावरण राममय बनले.

विशेष म्हणजे कोल्हापूरच्या संगीत क्षेत्रातील उच्चशिक्षित व अनुभवी कलाकारांचा यामध्ये समावेश होता. गायक अभिषेक पटवर्धन, प्रल्हाद जाधव, प्रसाद कुलकर्णी, डॉ.शितल धर्माधिकारी, गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर यांनी अतिशय बहारदार व सुरेल गायन केले.व्हायोलिन  बासरीसह सर्वच वाद्यांच्या आविष्काराला रसिकांनी भरभरून दाद दिली. प्रसिद्ध निवेदक मनीष आपटे यांनी समर्थपणे श्रीराम कथेचे निवेदन केले. 

या संगीत सोहळ्याला शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ,राजे प्रविणसिंह घाटगे, विनोदकुमार लोहिया,सौ नंदितादेवी घाटगे,सौ श्रेयादेवी घाटगे, राजे वीरेंद्रसिंह घाटगे,अभय देशपांडे,ओंकार देशपांडे ,शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सुधा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत शाहूचे संचालक यशवंत माने यांनी केले. प्रास्तविक धैर्यशील इंगळे यांनी केले.आभार समरजितसिंह घाटगे यांनी मानले.

स्व.राजेंनी कागलमध्ये प्रतिअयोध्या निर्माण केली

खास.धनंजय महाडिक

यावेळी खास. धनंजय महाडिक म्हणाले, स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून अयोध्येआधी कागलमध्ये भव्य-दिव्य श्रीराम मंदिराची उभारणी करून त्यांनी येथील जनतेच्या भावना जपत प्रतिअयोध्या निर्माण केली आहे.अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे अत्यंत भक्तीभावाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्व.राजेंची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा त्यांनी जपली आहे.

उच्यांकी गर्दी
कागल मध्ये प्रथमच झालेल्या या अध्यात्मिक कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. कलाकारांच्या बहारदार सादरीकरणास श्रोत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

🤙 9921334545