डोकेदुखीचे समस्या ही सामान्य मानली जाते. मात्र त्याची तीव्रता वाढली की वेदना असह्य होतात. डोकेदुखीची कारणेही वेगवेगळी असू शकतात. कधीकधी तणाव असह्य झाल्याने किंवा मायग्रेनमुळंही डोके दुखु शकते.अशातच तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यानेही डोकेदुखी वाढू शकते. अतिप्रमाणात साखरेचे सेवन हे शरीरासाठी नुकसानदायक असते. पण साखरेच्या अतिसेवनाने डोकेदुखीची समस्याही तीव्र होऊ शकते.
साखर किंवा गोड अतिप्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणात चढ-उतार होतात. त्यामुळं डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. साखर खाल्ल्याने होणाऱ्या डोकेदुखीचा संबंध तुमच्या रक्तातील ग्लुकोजची मात्रा वाढवते. ग्लुकोज तुमच्या शरीराला उर्जा देते आणि तुमचा रक्तप्रवाह वाढवूही शकते किंवा घटवूही शकते. तुमचे शरीर इन्सुलिनसह पेशींमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवते किंवा कमी करते. तुमच्या ग्लुकोजच्या पातळीत होणारे चढ-उतारांचा तुमच्या मेंदूवर जास्त परिणाम होतो. या मुळंच अतिप्रमाणात गोड खाल्ल्याने डोकेदुखी होऊ शकते.
रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. या परिस्थितींना अनेकदा हायपरग्लायसेमिया आणि हायपोग्लाइसेमिया असे म्हटले जाते.
हायपरग्लायसेमिया आणि हायपोग्लाइसेमिया
जर एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होतोय तर या व्यक्तीला हमखास गोड खाल्ल्यामुळं त्रास होऊ शकतो. असं यामुळं होत की शरीरात हायपरग्लायसेमिया किंवा हायपोग्लाइसेमियाचा धोका वाढतो. काहीवेळा मधुमेह नसलेल्या व्यक्तीलाही हा त्रास उद्भवू शकतो.
हायपरग्लायसेमिया म्हणजे काय?
हायपोग्लाइसेमिया ही अशी स्थिती आहे जी रक्ताभिसरणात पुरेसे ग्लुकोज नसल्यामुळे उद्भवते. जेव्हा तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी 70 mg/dl च्या खाली जाते तेव्हा हे सहसा घडते.
उपवास घडला तरी होऊ शकते अशी समस्या
एखादा दिवस तु्म्ही उपवास केला किंवा अन्य कारणांमुळं खूप वेळापासून तुम्ही उपाशी आहात. तरीदेखील ही समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला मधुमेह आहे तर तुम्ही हायपोग्लायसीमियाचा त्रास होऊ शकतो कारण शरीर रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही इन्सुलिन घेत असाल तर हे आणखी वाढू शकते. त्यामुळं डोकेदुखी होऊ शकते. जेवल्यानंतर तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत झपाट्याने घट होते. हे सगळं चार तासांच्या आत होते. शरीरात जेवण गेल्याने तुमच्या रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढते आणि तुमचे शरीर अधिक इन्सुलीन तयार करु लागते.