इटकरे गावातील स्वयंभू हनुमान प्राणप्रतिष्ठापणा व हनुमान मंदिर सुशोभीकरण लोकार्पण सोहळा संपन्न..

सांगली : इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील जागरूक देवस्थान स्वयंभू हनुमंत मंदिर या मंदिरातील सातशे ते आठशे वर्षापूर्वीची स्वयंभू पाषाण होते त्याचे वज्रलेप करून त्याच्या शेजारी आज श्रीराम प्रभू राम माता सीता व लक्ष्मण यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आणिश्री स्वयंभू हनुमान प्राणप्रतिष्ठापणा प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई मूर्ती प्रतिष्ठापणा श्री हनुमान मंदिर परिसर सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आज 5 वाजता डेप्युटी कलेक्टर दीपक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री श्री हनुमान मंदिर कामाचा भव्य लोकार्पण सोहळानिमित्त हजारो च्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्राती तालुक्यातील सर्व भजनी मंडळ यांनी उपस्थीत दर्शविली
प्रथम दिवशी

श्री हनुमान, श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई मुर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य ग जरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली व रात्री नऊ वाजतापालखी सोहळा. भव्य प्रमानात आयोजित केला होता आज धार्मिक विधी होम, हवन पुजन. आणि दुपारी 3 वाजता श्री.ष.ब्र.प्र. १०८. डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचे प्रवचन आणि . महाआरती
करणेत आणि संध्याकाळी . महाप्रसाद
सायं.७ वितरण करणेत आले
कोल्हापूर सांगली सातारा परिसरातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते

वैशिष्ट्य म्हणजे इटकरे या गावातील सुशोभीकरण व मंदिर तसेच श्री हनुमंत यांच्या मूर्ती चा वज्रलेप आणि मंदिराच्या आसपास सुशोभीकरण आणि भव्य मंदिर उभारणी साठी सर्व ग्रामस्थ आणि देणगीदार तसेच ओम गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते श्री हनुमान मंदिर सुशोभीकरण समिती चे कार्यकर्ते यांनी अहोरात्र कष्ट करून हे भव्य मंदिर उभारले आहे भागातील नेते आमदार व महाराष्ट्रातील कायम सत्तेत असणाऱ्या एका राजकीय व्यक्तीने अजिबात एक रुपये ची आर्थिक मदत केली नाही हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल
:

महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मोबाईल शौकिनांसाठी मंदिराच्या प्रांगणामध्ये सेल्फी पॉईंट तसेच लहान मुलांना मनोरंजनासाठी भव्य लॉन वयोवृंदासाठी शांततामय बसण्याचे विरंगुळा कट्टे उभारण्यात आलेले आहेत