राजर्षी शाहूंच्या नगरीत मिळालेला पुरस्कार सर्वोत्तम : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : जीवनात मोहाचे अनेक प्रसंग येत असतात. त्याला बळी न पडता संघर्ष करून यशस्वी जीवन जगण्याचं कौशल्य हे केवळ कोल्हापुरातच मिळते. यापूर्वी मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, राजर्षी शाहूंच्या नगरीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी सर्वोत्तम असल्याचे मानतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली व परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

शनिवारी (दि. 6 जानेवारी 2024) मराठी पत्रकार दिन आणि युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचा 14 वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून “पुरस्कार वितरण सोहळा 2024” आयोजन करण्यात आले होते. साईक्स एक्सटेन्शन येथील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना “भारतभूषण” पुरस्कार,
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथ प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना डॉ. मुळे बोलत होते.

यावेळी बोलताना डॉ. मुळे म्हणाले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांनीही पत्रकारिता केली होती. त्यांचा आदर्श आजच्या पत्रकारांनी घेणे गरजेचं आहे. समाजाला दिशा देणारे व समाज घडविण्याचे काम पत्रकार करत असतो.

यापूर्वीचे पत्रकार आपल्या परखड लेखणीतून वृत्तपत्रांमध्ये निरीक्षण, वस्तुस्थिती, परखड विचार मांडून सरकारचे सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधून न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करायचे. समाज घडवण्याचं महान कार्य पत्रकार करत असतात. पत्रकारांचे समाजासाठी मोलाचं योगदान आहे.

डॉ. मुळे पुढे म्हणाले, पूर्वीपासून असणारी वैचारिक चौकट आजही सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण घडवत असल्याच त्यांनी नमूद केल. जर कोल्हापूर नसतं तर मी घडलोच नसतो. मला या कोल्हापूरनं घडवलय. कोल्हापूर हे माझं हक्काचं गाव आहे. असे सांगून त्यांनी कोल्हापुरातील शालेय जीवनातील आपल्या आठवणींना उजाळा दिला.

युवा पत्रकार संघ आणि दिल्ली भेट…!

जेथे सरकार पोहोचत नाही तिथं आपली चांगुलपणाची चळवळ पोहोचते. या चांगुलपणाच्या चळवळींने आता राष्ट्रीय स्वरूप घेतले आहे. युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यच्या पत्रकारांनी दिल्ली येथे भेट घेऊन संवाद साधण्याच्या चर्चेच्या आठवणीला उजाळा दिला. यावेळी माझ्याकडून देशभर सुरू असलेल्या “चांगुलपणाची चळवळ” अभियानासंदर्भात माहिती पत्रकारांनी जाणून घेतली. यानंतर चळवळीला पाठिंबा दर्शवत युवा पत्रकार संघ सहभागी होणार असल्याचेही यावेळी डॉ. मुळे यांनी सांगितले.

यानंतर बोलताना इतिहास तज्ञ व प्रभावी वक्ते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया घातला. त्यांचा विचारांचा वारसा जोपासत ज्येष्ठ पत्रकारांनी आजपर्यंत शोध पत्रकारिता, डावी – उजवी विचारसरणी आदींविषयी आपल्या परखडलेखनीतून समाजाला दिशा देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी इतिहासातील पत्रकारितेचे दाखले देत “पत्रकारितेचे बदलते स्वरूप” याविषयी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.

यानंतर बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोण लिहित त्याची विश्वासार्हता यातून खरी पत्रकारिता जन्माला येते पत्रकारिता वरत आहे म्हणणे सोपे आहे पण ते सांभाळणे अवघड आहे सध्या प्रसार माध्यमातून बातम्यांची स्पर्धा सुरू आहे खात्री न झाल्याने ब्रेकिंग न्यूज होते. स्पर्धेपेक्षा वास्तवाचे स्वरूप समाजापुढे आणणे व योग्य बातमी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे.

– विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे 30 व्यक्तींचा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कर्तव्यदक्ष अधिकारी,

शहर अभियंता म्हणून गेले अनेक वर्ष कोल्हापूर महापालिकेत प्रामाणिक शिस्तबद्ध पद्धतीने सेवा बजावून अनेक योजनेवर निर्णायक निर्णय घेऊन विकास केला, सध्या जल अभियंता म्हणून कार्यरत याची दखल घेऊन नेत्रदीप सरनोबत यांना – कर्तव्यदक्ष अधिकारी, राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

युवा समाज गौरव

अमर बबन देसाई यांनी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे पदाधिकारी असून स्व, डॉ पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामात सक्रिय सहभाग एन एस यू आयच्या माध्यमातून अनेक युवकांना दिशा देण्याचा प्रयत्न केला यांची दखल घेऊन युवा पत्रकार संघाने — युवा समाज गौरव पुरस्काराने सन्मानित केले.

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

मोहसीन मुल्ला गेली वीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत .शिवाजी विद्यापीठातून पत्रकारीतेचे शिक्षण घेतल्यानंतर लोकमत मधून 2003 पासून त्यांनी आपली कामाला सुरुवात केली.सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया ,महाराष्ट्र टाइम्स, पुढारी बीबीसी अशा अनेक माध्यमांचा प्रदीर्घ अनुभव असणारे मोहसीन मुल्ला यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.

कर्तव्यदक्ष अधिकारी

देवापापा दत्तात्रय शिंदे कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग इस्लामपूर, त्यांनी आज अखेर किल्लारी अंतरराजे पाटबंधारे प्रकल्प वारणा पाटबंधारे प्रकल्प आकुर्डी उपसा सिंचन योजना अशा विविध प्रकारच्या योजनेअंतर्गत उल्लेखनी कार्य करून नागरी सुविधा पुरविल्या आहेत. 2018 सालापासून जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

यशस्वी उद्योजक

जूनेद कययूम खान उद्योजक 2010 पासून उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत स्टाईल आऊट मेन्स वेअर द्वारे त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे
त्यांच्या या यशस्वी प्रवासाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

वेदांत प्रमोद नेब – पत्रकार एबीपी वेदांत नेम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेची मास्टर डिग्री घेतली. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक नागरिक समस्यांच्या वाचा फोडून सरकारची लक्ष वेधले. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कर्तव्यदक्ष जनसंपर्क अधिकारी पुरस्कार

दत्ता आवळे यांनी माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर, यांच्या कडे पाच वर्ष, सध्या राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे पंधरा वर्षे असे वीस वर्ष कर्तव्यनिष्ठ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत आहेत.त्यांना कर्तव्यदक्ष जनसंपर्क अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे 30 व्यक्तींचा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.