कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र व संपूर्ण देशामधील एक अग्रगण्य सहकारी दूध संघ म्हणून गोकुळचा नावलौकिक सर्वत्र आहे. दूध संकलन, दूध प्रक्रिया व विक्री या संपूर्ण साखळीमध्ये गोकुळच्यावतीने शास्त्रीय दृष्टीकोन व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. गोकुळच्या उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने गोकुळ ही एक सहकारातील आदर्श संस्था ठरली आहे. असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील यांनी काढले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी गोकुळतर्फे संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.