डी वाय पाटील फार्मसीची विद्यार्थिनी राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत अव्वल

कोल्हापूर: डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व रिपकॉर्ड फार्मासिटीकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. महाविद्यालयाच्या सिमरन जे. पटवेगार हिने पोस्टर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

जयसिंगपूर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये सिमरन पटवेगर हिने पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोनल जैन व आदनान ताम्हणकर यांच्या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तर मारिया बागवान आणि सिमरन पटवेगार यांच्या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

महाविद्यालयाच्या नम्रता पाटील, तन्वी पोकळे व सुमैय्या बागवान या विद्यार्थिनी ही पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत उत्तम पोस्टरचे सादरीकरण केले. या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. केतकी धने व प्राचार्य चंद्रप्रभू जंगमे यांचे मार्गदर्शन लाभले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

🤙 9921334545