स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी घेतली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीजनिर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या वरदहस्ताने अदानी उद्योग समूहाने हालचाली गतिमान केल्या असून येत्या दोन-अडीच वर्षांत शीघ्र गतीने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामार्गे समुद्राकडे वळवल्याने भुदरगड,कागल,शिरोळ सह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी मिळणार आहे. अशा विविध विषयांवर चर्चा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली.

कराराप्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळम्मावाडी व चांदोली धरणातून जादा पाणी द्यावे लागणार आहे.याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासहित म्हैशाळ योजनेवर अवलूंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसणार आहे केंद्र सरकारने अदानी उद्योग समुहाचे हित डोळ्यासमोर ठेऊन घेतलेल्या या निर्णयामुळे सांगली कोल्हापूर सह सीमाभागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

एकीकडे इचलकरंजी शहरातील जनता पिण्याच्या थेंब- थेंब पाण्यासाठी तडफडत असताना केंद्र सरकारने वास्तविक पाहता या धरणातून पिण्याचे पाणी,शेतीचे पाणी व उद्योगासाठी जे पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. तसेच पुढील तीस वर्षाचे पाणी वाटप नियोजन या सर्व गोष्टींचा जलसंपदा अथवा राज्य सरकारकडून अभिप्राय न घेता अदानीच्या हितासाठी केंद्र सरकारने लाळ घोटेपणा केलेला आहे.

सदरच्या प्रकल्पाला वापरले जाणारे पाणी कोल्हापूर जिल्ह्यातुन जाणार असून प्रकल्प वीजनिर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली जाणार आहे कोकणामध्ये या अदानी उद्योग समूहाच्या प्रकल्पाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बळ मिळण्यासाठी शिवसेनेने उघडपणे या आंदोलनात सहभागी होणाबाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी सेनाप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले कि आदानीच्या धारावी बळकविण्याच्या राक्षसी प्रवृत्ती विरोधात आम्ही लढतोच आहोत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे राहू.

या बैठकीमध्ये खासदार संजय राऊत ,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मा.बांधकाम व आरोग्य सभापती सावकार मादनाईक यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.