कोल्हापूर :- कोजीमाशि पतपेढीमध्ये फक्त ४२ कोटीच्या ठेवी असताना तब्बल १३ कर्मचारी नेमले आहेत.संस्थेच्या एकूण नफ्यातील सत्तर टक्के भाग या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होतो यातून सभासद हित ते काय ? असा प्रश्न उपस्थित करत नोकर भरती आणि शाखा विस्तार हा संचालक व सुकानुसमितीच्या हितासाठीच आहे असा आरोप मुख्याध्यापक संघाचे संचालक जितेंद्र म्हैशाळे यांनी केला.
कोजीमाशि पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी सहकार आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित हातकणंगले माध्यमिक विद्यालय येथे प्रचार बैठकीत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड होते.
या अगोदर या पतपेढीचे हित जाणणारे स्वर्गीय लोकापुरे सर आणि साठे सर यांनी कार्य करत असताना शाखा विस्तार हा संस्थेच्या हिताचा नाही हे ओळखले होते.त्यामुळे त्यांनी नोकरभरती व शाखा विस्तार नाकारला होता.पण या सत्ताधाऱ्यांनी शाखा विस्तार आणि नोकर भरती हे एकच मुख्य काम या पाच वर्षात केले.संस्थेचे हिता पेक्षा स्वहित जोपासणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना पराभूत करून संस्था प्रगती साठी स्वाभिमानी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन दादासाहेब लाड यांनी केले.
प्रगतीपथावर असणाऱ्या कोजीमाशि पतसंस्थेत तब्बल ५७२ कोटीच्या ठेवी असून जिल्ह्यातील चौदा शाखेत सरासरी ४२ कोटीच्या ठेवी आहेत पण कोजिमाशि पतपेढीच्या तुलनेने कोजीमाशि पतसंस्थेच्या एका शाखेत तीन ते चार कर्मचारीच काम करत आहेत.मग ४२ कोटीच्या ठेवीसाठी पतपेढीच्या शाखेत तेरा कर्मचारी कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात पतसंस्थेप्रमाणे पतपेढीलाही आपण वैभव प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून यासाठी स्वाभिमानी आघाडीला सत्ता द्या असे आवाहन दादासाहेब लाड यांनी केले.
स्वागत राकेश मळवडे यांनी केले.
प्रास्ताविक एस.एस.कामत यांनी केले.यावेळी एस.एस.निंबाळकर,सुजित पाटील,रामराव पाटील,सौ नीता सुतार,सौ जे के पाटील,ए बी नायकवडी,संजय कांबळे,विनायक वायचळ, उमेदवार संदीप दाइंगडे, मदन निकम, श्रीकांत पाटोळे,श्रीकांत कदम आदी उपस्थित होते.आभार एस एस कामत यांनी मानले.