शाहूच्या सभासदांना ऊस विकास योजना अंतर्गत अनुदान चेक वाटप

(कागल ) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजने अंतर्गत विविध योजनेतील लाभार्थी सभासदांना अनुदान चेक वाटप कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते केले.

ऊस विकास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेचा चेक वितरण समारंभ कारखान्याच्या प्रधान कार्यालयात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली व कुशल मार्गदर्शनाखाली सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस विकास योजना सुरू केल्या आहेत. सभासदांना त्याचा चांगला लाभ होत असून ऊस उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होत आहे.सभासदांचे हित जपत प्रगतशील शेतीसाठी प्रयत्न करणारा छ शाहु हा एकमेव कारखाना असावा..

यावेळी वाटप केलेल्या ऊस विकास योजनावाईज लाभार्थ्यांचा सविस्तर तपशिल असा.कंसात अनुदान रक्कम
श्रीमंत विजयादेवी घाटगे महिला ठिबक योजना (८७,४00)
जनरल ठिबक सिंचन योजना- (२,७५,२२५)
मोटर पाईपलाईन योजना-(३०००)
शेती औजार – (५५०००)

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक युवराज पाटील, सचिन मगदूम,सतीश पाटील,सुनिल मगदुम, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक शेती आधिकारी रमेश गंगाई यांनी तर आभार ऊस विकास आधिकारी दिलीप जाधव यांनी मानले