कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सहा आमदारांना केवळ दहा टक्के निधी देणे हे जनतेच्या विरोधातील धोरण आहे. महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारने राज्यभरातील जिल्हा नियोजन समित्यांचे नाव बदलून आता ‘सत्तारूढ निधी वितरण समिती’ असे नाव ठेवावे असे विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
सत्ताधारी म्हणून ५/१० टक्के निधी जादा घेणे समजू शकतो. परंतु सहा आमदारांना फक्त १० टक्के निधी हे केवळ आणि केवळ दुर्दैवी याबाबत पालकमंत्र्यांना सर्व काँग्रेस आमदारांच्या वतीने पत्र देण्यात आला आहे तसेच आठ जानेवारीला होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकी आक्रमक भूमिका घेणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितले