महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला हलणार

सिंधुदुर्ग: जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी धडाडीने काम करण्यास प्रसिद्ध आहेत त्यांनी नुकताच नौदल दिन यशस्वी करून दाखविला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या द्वयींनी सिंधुदुर्गच्या पाणबुडी प्रकल्पात लक्ष घातला तरच हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो. अन्यथा गुजरातच्या स्वप्नांमध्येच धन्यता मानण्याची वेळ सिंधुदुर्ग वासियांवर येणार आहे.

कसा होता पाणबुडी प्रकल्प

सिंधुदुर्गात साकारला जाणारा पाणबुडी प्रकल्पात कर्मचाऱ्यांसह २४ प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येणार होती. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी ५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर १०० ते १५० कोटींची उलाढाल होणार होती. प्रकल्पाचे अभ्यासक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याशी याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

महाराष्ट्राची संकल्पना गुजरात साकारते

गुजरात सरकार आणि माझगाव डॉकयार्ड द्वारकेच्या समुद्रात असाच पाणबुडी प्रकल्प राबवित आहेत. जानेवारीत व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये याची अधिकृत घोषणा होणार आहे. समुद्रात ३०० फूट खोल जाऊन पर्यटकांना समुद्रात बुडलेल्या द्वारका शहराच्या अवशेषांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

🤙 9921334545