भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) देशाचे पूर्व पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती २५ डिसेंबर रोजी साजरी केली जाते. यानिमित्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस भाजपाच्यावतीने सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

याच धर्तीवर आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालयात भारताचे पूर्व पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्य प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.

खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी चंदगड विधानसभा प्रमुख शिवाजी पाटील, सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धन, दिलीप मेत्राणी, संपतराव पवार, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरवातीला अटलजींच्या जयंती निमित्य आणीबाणीमध्ये सामील असणाऱ्या जेष्ठ पदाधिका-यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये भाऊसाहेब गणपुले, प्रमोद जोशी, विद्याधर काकडे, अशोक फडणीस, सी.बी.पाटील, लक्ष्मी दामोदर, अनुसाई सकदेव, कुलकर्णी यांचा समावेश होता. यानंतर युवा मोर्चाच्या माध्यमातून कोल्हापुरात होणाऱ्या नमो चषक स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यानंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी आजचे व्याख्याते उदयराव सांगवडेकर यांचा परिचय सर्वांना करून दिला.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अटलजींचे विचार, कार्यस्वरूप आजच्या युवा पिढीला समजण्यासाठी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते मा.उदयराव सांगवडेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हा कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रमुख मार्गदर्शक मा.उदयराव सांगवडेकर म्हणाले, आचार्य चाणक्याची महत्त्व प्रतिभा त्यांच्याकडे होती सम्राट चंद्रगुप्ता सारखं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं, भगवान बुद्धाची करुणा ज्यांच्या मध्ये आहे, भगवान महावीरांचे तपस्वी जीवन अशा विविधांगी जीवनाची अनुभूती जीवनाकडे बघितल्यानंतर आपल्याला येते आणि गुरुगोविंद सिंग यांचा संघर्ष कसा करायचा याचे उत्कृष्ट एकत्रित उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर ते श्रद्धेय अटलजी होय.
गगन मे लहरता है भगवा हमारा ।
घिरे घोर घन दासताँ के भयंकर
गवाँ बैठे सर्वस्व आपस में लडकर
बुझे दीप घर-घर हुआ शून्य अंबर
निराशा निशा ने जो डेरा जमाया
ये जयचंद के द्रोह का दुष्ट फल है
जो अब तक अंधेरा सबेरा न आया
मगर घोर तम मे पराजय के गम में विजय की विभा ले
अंधेरे गगन में उषा के वसन दुष्मनो के नयन में
चमकता रहा पूज्य भगवा हमारा॥१॥
या त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी लिहलेल्या कवितेतून त्यांची मातृभूमी, भारत देश याबद्दलची आत्मीयता दिसून येते. सध्याच्या काळात राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने एकमेकांचा विकास व्हायचे असेल तर अटलजींचे विचार आपणा सर्वांना नेहमीच प्रेरणादायी असणार आहेत. एकात्मतेचा विचार संपूर्ण

 
🤙 8080365706