भीम पँथर संघटनेचा श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे या बँकेची पंचवार्षिक निवडणूक 24 डिसेंबर रोजी होत आहे. या बँकेसाठी दुरंगी लढत असून भीम पॅंथर संघटनेने अमर पाटील (शिंगणापूरकर) यांची भेट घेऊन श्री राजर्षी शाहू संस्थापक , पॅनेलला आपला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष साताप्पा सोनाळकर , धनाजी सकटे, जिल्हा अध्यक्ष दादासाहेब माने,धनाजी कांबळे, उदय गिंजगे, प्रशांत जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545