जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ अध्यक्षपदी व्ही. बी. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या अध्यक्षपदी उद्योजक व्ही. बी. पाटील यांची, तर शहराध्यक्षपदी हिंदकेसरी पैलवान दिनानाथसिंह यांची फेरनिवड करण्यात आली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडी बिनविरोध झाल्या. मोतीबाग तालीम येथे ही सर्वसाधारण सभा झाली.

दरम्यान, या सभेत चिफ पेट्रन म्हणून कुस्ती मार्गदर्शक बाळ गायकवाड यांची, तर जिल्हा सरचिटणीस म्हणून माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे यांची निवड करण्यात आली. सभेचे स्वागत व प्रास्ताविक अॅड. आडगुळे यांनी केले. ताळेबंद व अहवाल वाचनास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. या सभेत २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

जिल्हा कार्यकारिणी
कार्याध्यक्ष- पै. संभाजी वरुटे, वरिष्ठ उपाध्यक्ष- पै. नामदेवराव मोळे, उपाध्यक्ष- पै. अमृत भोसले, पै. विनोद चौगुले, विष्णू जोशीलकर, चंद्रकांत चव्हाण, माणिक मंडलिक, खजानीस- नीलेश देसाई, कार्यालयीन चिटणीस- पै. संभाजी पाटील, चिटणीस- पै. संभाजी पाटील, राजाराम चौगुले, बाजीराव पाटील, अशोक पोवार.

शहर कार्यकारिणी
कार्याध्यक्ष- अशोक माने, उपाध्यक्ष- बाजीराव कळंत्रे, विजय साळोखे, पै. प्रकाश खोत, पै. सर्जेराव पाटील, पै. महेश नलवडे खजानीस – दामोदर कुलकर्णी, सेक्रेटरी – पै. विश्वास हारुगले, बापू लोखंडे, अमित गाठ, मारुती जाधव.

🤙 9921334545