शनिवारी अक्षर गप्पामध्ये सिंबायोसिसचे डाॅ. मुजुमदार

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र, येथील सारस्वत बोर्डिंगचे माजी विद्यार्थी आणि पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे डॉक्टर संस्थापक पदमभूषण डाॅ. शां. ब. मुजुमदार हे आज अक्षरगप्पा कार्यक्रमामध्ये आपला प्रवास मांडणार आहेत.

अक्षर दालन आणि  निर्धार यांच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता कोळेकर तिकटीवरील अक्षरदालन येथे आयोजित करण्यात आला आहे. गडहिंग्लज येथील शालेय शिक्षण, कोल्हापूरमधील वास्तव्य, गोखले महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालयातील अध्यापन आणि एका विशिष्ट क्षणी सिंबायोसिसची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय याबद्दल ते विस्ताराने मांडणी करणार आहेत. 

आज सिंबायोसिस हे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हणून मान्यताप्राप्त असून या परिसरात डॉ. मुजुमदार यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उभारलेले संग्रहालय देशभरात प्रसिध्द आहे. या सगळ्या प्रवासाची कहाणी डाॅ. मुजुमदार या कार्यक्रमात मांडणार आहेत. यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रविंद्र जोशी यांनी केले आहे.