व्हाईट आर्मीच्या सेवेला माजी आमदार अमल महाडिक यांचा हातभार

कोल्हापूर : कोल्हापुरात सध्या सैन्य दलाच्या वतीने अग्नीवीर भरती प्रक्रिया सुरू आहे. सैन्यात भरती होण्याच्या जिद्दीने कोल्हापूरसह सांगली सातारा आणि कोकणातून तरुण कोल्हापुरात येत आहेत. दररोज जवळपास 2000 तरुण चाचणीला सामोरे जात आहेत. या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था व्हाईट आर्मी कडून करण्यात येत आहे.

सर्वांसाठी मोफत जेवण देण्याच्या या उपक्रमाची दखल घेत माजी आमदार अमल महाडिक यांनी यासाठी लागणारे धान्य व्हाईट आर्मी कडे सुपूर्द केले. सोमवार पर्यंत चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी तांदूळ, तूरडाळ, खाद्यतेल इत्यादी अन्नधान्य व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्याकडे देण्यात आले.

निरपेक्ष भावनेने सेवा देणाऱ्या व्हाईट आर्मीच्या या उपक्रमाला कर्तव्य भावनेतून मदत करून अमल महाडिक देशसेवेत खारीचा वाटा उचलला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम, माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, जयराज निंबाळकर, के. एस. पाटील यांच्यासह व्हाईट आर्मीचे जवान उपस्थित होते.

🤙 8080365706