लोकसहभागातून एन.एम.एम.एस सराव चाचणी घेणारा कोल्हापूर माध्यमिक विभाग हा राज्यातील पहिला शिक्षणविभाग:-डॉ.एकनाथ आंबोकर यांची माहिती.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा गुणवत्तेमध्ये राज्यात नेहमीच अग्रेसर आहे. याचे कारण म्हणजे या जिल्ह्यातील होतकरू शिक्षक त्या प्रमाणे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे प्रशासन व पदाधिकारी ५ वी ,८ वी शिष्यवृत्ती असेल 8 वी NMMS शिष्यवृत्ती असेल राज्यामध्ये सर्वात अधिक वाटा असणारा जिल्हा आहे.

शिक्षकांच्या कामाला खऱ्या अर्थाने चालना मिळते ती प्रशासनाकडून राबवले जाणारे नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे त्याचा एक भाग म्हणून माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर मार्फत या वर्षी आयोजित केलेली NMMS सराव चाचणी होय.
श्री. संतोष पाटी( मुख्यकार्यकरी जि.प. कोल्हापूर),याच्या प्रेरणेतून,डॉ एकनाथ आंबोकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक) यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री.गजानन उकिरडे (उप- शिक्षणाधिकारी),श्री.अजय पाटील (उप- शिक्षणाधिकारी),श्री. विश्वास सुतार (प्रभारी गटशिक्षणाधिकारी शाहूवाडी),श्री.डी सी कुंभार (विस्ताराधिकारी) ,जयश्री जाधव (विस्ताराधिकारी), रत्नप्रभा दबडे (विस्तराधिकारी)यांच्या सहकार्यातून व श्री दिगंबर मोरे (उप- शिक्षणाधिकारी),श्री.धनाजी पाटील (विस्ताराधिकारी शिक्षण) यांच्या संकल्पनेतून चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजी,(तात्यासाहेब मुसळे हाय व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी) या संस्थेचे अध्यक्ष श्री. कस्तुरे सर व कार्यवाहक श्री. तारे सर यांच्या दातृत्वातुन दिनांक १०/१२/२०२३ रोजी जिल्हास्तरीय सराव चाचणी घेण्यात आली. अशा प्रकारची लोकसहभागातून सराव चाचणी घेणारा कोल्हापूर माध्यमिक विभाग हा राज्यातील पहिला शिक्षणविभाग ठरला आहे.
या चाचणीसाठी २६३२५ विद्यार्थ्यां पैकी २५९८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सराव परीक्षेला बसलेली विद्यार्थ्यां पैकी २२६८ विद्यार्थी ११० गुणांच्या वरती असून, हे सर्व विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती साठी पात्र होण्याची खात्री आहे. त्या प्रमाणे ८१३८ विद्यार्थ्याना ८० गुणांच्या पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत हे सर्व सारथी शिष्यवृत्ती पात्र होण्याची शक्यता आहे.
चाचणी नियोजनबद्ध व काटेकोरपणे कुटूंबप्रमुख डॉ. एकनाथ आंबोकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक) यांच्या नेतृत्वाखाली सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्ताराधिकारी ,सर्व केंद्रप्रमुख, सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले .या चाचणीचे पेपर तयार करण्याचे काम श्री. प्रवीण आंबोळे (व्यंकराव हाय इचलकरंजी),श्री. निवास फराकटे (दुधसाखर विध्यानिकेतन बिद्री) ,श्री. विजय सुतार(वि.मं मादळे), श्री.ए.आर.पाटील यांनी केले असून उर्दू माध्यमाचे पेपर परवेज जहांगीर, शबाना मोमीन (अँग्लो उर्दू हाय कराड). करमळकर गुलस्वार (नॅशनल हाय इचलकरंजी) इब्राहिम फैज (अल्लामा इकबाल हाय कुरुंदवाड)यांनी केले.
सर्व शाळांनी पुढील पंधरा दिवस अधिकचा वेळ देऊन, जास्तीतजास्त विद्यार्थी गुणवत्ता धारक करण्याचा प्रयत्न करून जिल्ह्याचे नाव उज्जवल करावे.असें आव्हाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांनी केले.