अन्यथा संस्थापक पॅनेल ताकदीने उतरणार – अध्यक्ष एकनाथ पाटील

दोनवडे (प्रतिनिधी) – गेल्या सहा वर्षात यशवंतच्या आर्थिक प्रगती दुप्पट केली असून होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बँकेच्या एकूण प्रतिमेला गालबोट लागू नये म्हणून शेवटपर्यंत बिनविरोध साठी प्रयत्न सुरू आहेत काही मतभेद असले तरी विश्वासात घेऊन ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा करत बँक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार त्यात अपयश आले तर संस्थापक सत्तारूढ पॅनेल ताकदीने उतरणार असल्याचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सांगितले.

आज बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष के एन पाटील यांचे प्रमुख उपस्थित होते.

बँक बिनविरोध करण्यासाठी सुकाणू समिती नेमली आहे सत्तारूढ गटातील मतभेद दूर करण्यासाठी सात ते आठ वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत.विनय कोरे यांना याबाबत मध्यस्थी करण्यासाठी आग्रह केल्यानंतर एक पर्याय समोर आला पण गावावर उमेदवारी देण्याच्या कारणावरून यावर एकमत झालेले नाही. शेवटच्या दिवशी पर्यंत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ पाटील यांनी सांगितले.
बँकेने सातत्याने आर्थिक घोडदौड कायम ठेवले आहे सभासदांना सेवा पुरवण्यासाठी आधुनिक प्रणाली दिली आहे एफ एस डब्ल्यू या कॅटेगरीत बँक असल्याने बँकेला तीन शाखांना परवानगी मिळाली आहे बँकेचा तीनशे कोटीवर व्यवसाय घेऊन जाणार असून यासाठी मतभेद दूर करून सर्व गटांना बरोबर घेऊन बँक विरोध करणार असल्याचे सांगितले यावेळी संचालक आनंदराव पाटील सर्जेराव पाटील संग्राम भापकर दादासो पाटील पांडुरंग पाटील पांडुरंग माजगावकर व कार्यकर्ते उपस्थित होते