अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाची झलक आली समोर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाची झलक आली समोर; जिथे होणार रामलल्लांची स्थापना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज (9 डिसेंबर) अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाचे छायाचित्र शेअर केले आहे. 

22 जानेवारी 2024 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.5 वर्षांच्या श्रीरामांची ही मूर्ती असणार आहे. सध्या 3 मूर्त्या बनवण्याचं काम सुरू असून सर्वात रेखीव मूर्ती अंतिम केली जाणार आहे.