कोल्हापूर (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त १० ते २४ डिसेंबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर शहर व जिल्हा स्तरावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व शहराध्यक्ष आर.के.पवार यांनी पक्ष कार्यालयातील झालेल्या बैठकीत दिली.
शरद पवार यांचा येत्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असुन पक्षाच्या शिवाजी स्टेडियम येथील शहर कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तसेच या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर के पोवार यांनी यावेळी केले. तसेच मिरजकर तिकटी येथील अंध मुलांच्या शाळेतील मुलांना जेवण देण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.
यावेळी महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, सरचिटणीस सुनील देसाई, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, राष्ट्रवादी प्रदेशचे विनय कदम, रामराजे कुपेकर, गणेश जाधव सादिक आत्तार, महादेव पाटील नागेश परांडे चंद्रकांत सूर्यवंशी रियाज कागदी, मुसाबाई कुलकर्णी, नागेश शिंदे निलेश मछले, गणेश नलवडे दिनकरराव धोंगडे, फिरोज सरगुर, अमोल जाधव सरोजिनी जाधव अरुणा पाटील इत्यादी महिला कार्यकर्त्यांसह विविध सेलचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
