राज्यात पुढील 24 तासात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज….

मुंबई: मिचॉन्ग चक्रीवादळात देशासह राज्यात आजही पावसाची हजेरी  पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या इतर भागात वातावरण कोरडं राहणार आहे, राज्यातील अनेक भागात अद्यापही थंडीची प्रतिक्षा आहे. 

राज्यात ‘या’ भागात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.