सर्व सामान्य फळ विक्रेत्या कुटुंबातील सुनील पाटील यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल सरचिटणीस पदी निवड..

    कोल्हापूर :  कोल्हापूर येथील भाजपचे कार्यकर्ते सुनील पाटील यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल सरचिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र भाजप चे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

 सुनील पाटील यांनी याआधी बुथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर उपाध्यक्ष,अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.तसेच विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

    पक्षाच्या अनेक कार्यक्रमामध्ये असणारा सक्रीय सहभाग लक्षात घेऊन या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सत्यजित ( नाना ) कदम, राहूल चिकोडे, मंडल अध्यक्ष सतीश पाटील-घरपणकर या सर्वांच्या सहकार्याने त्यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.