रेंदाळच्या सुपुत्राने परदेशीं विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी घातली भुरळ!

रेंदाळ:रेंदाळ येथील तरुण शिक्षक डॉ. शिवाजीराव सादळे यांनी आपले शिक्षण शिवाजी विद्यापीठ येथे पूर्ण केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती (फेलोशिप ) वर फ्रान्स,जपान सह युरोपीय देशात विविध विषयावर संशोधक म्हणून निवड झाली. या काळात  त्यांनी संशोधना बरोबर परदेशीं फ्रेंच व जपाणी भाषेवर प्रभुत्व मिळवले.असं असले तरी ते मातृभूमीला विसरले नाहीत.

 एव्हढी विध्वता असणाऱ्या तरुणाला परदेशात भरमसाठ पगाराच्या नोकऱ्या पायघडया घालत असतांना, त्यांनी भारतातच व तेही जिथे शिक्षण घेतले त्या शिवाजी विद्यापीठातच आपण सेवा करण्याचा निर्णय घेतला.

 विद्यापीठ प्रशासनाने एखादी जबाबदारी दिली कि,त्या विषयाला झोकून देऊन काम करण्याच्या त्यांच्या गुणाचे विद्यापीठाने योग्य मूल्यमापन करून वर्षंभरापूर्वी डॉ. शिवाजीराव सादळे (सर )यांची विद्यापीठाच्या "इंटरेनॅशनल अफेअर सेल" च्या संचालक पदी निवड केली. ही जबाबदारी आल्यापासून त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांपर्यंत शिवाजी विद्यापीठातील विविध क्षेत्रात दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे उत्कृष्टरीत्या मार्केटिंग केले. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन विद्यापीठात परदेशी विध्यार्थी प्रवेश घेण्याची संख्या दुपटीने वाढली आहे. 

भारतातील तरुण परदेशात शिक्षणासाठी जात असतांना परदेशातील विद्यार्थी भारतात शिकायला येत आहेत. ही भारताच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आणि या यशात रेंदाळच्या सपुत्राचा वाटा आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सध्या विद्यापीठात 21 देशातील 66 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याबद्दल डॉ. शिवाजीराव सादळे सरांचे रेंदाळ परिसरातील तमाम जनतेकडून मनःपूर्वक अभिनंदन व भावी कार्यास शुभेच्छा!