आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या आवारातच संविधान दिन केला साजरा….

रेंदाळ : 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रामपंचायत रेंदाळ कार्यालयाला संविधान दिनाचा विसर पडला की काय अशी परिस्थिती पाहायला मिळाली. रेंदाळ मधील बौद्ध समाजातील समाज बांधव संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले असता ग्रामपंचायत कार्यालय बंद दिसले . बौद्ध समाज बांधवांच्या कडून संताप व्यक्त करण्यात आला . त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेरच समस्त बौद्ध समाज रेंदाळ यांचे वतीने संविधान फोटो पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी बौद्ध समाजाचे अध्यक्ष वामन कांबळे यांनी ग्रामपंचायत रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच अभिषेक पाटील, वैद्यकीय रजेवर असलेले .बी .टी. कुंभार ग्रामविकास अधिकारी , रेंदाळचा तात्पुरता चार्ज व तेही रजेवर असलेले राणे ग्रामसेवक , तसेच दाखले व उतारा सही साठी फक्त चार्ज घेतलेले माने ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्या यांचा जाहीर निषेध व्यक्त केला .
रेंदाळ ग्रामपंचायत चा कारभार मनमानी पद्धतीने चालतो शासकीय नियमाचे पालन केले जात नाही याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सुनावणी सुद्धा लागलेली आहे शासकीय नियमांपासून बगल देऊन चुकीच्या पद्धतीने कामकाज चालते याचा प्रत्यय ग्रामपंचायत मध्ये आला .

संविधान दिनानिमित्त रेंदाळच्या ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास बौद्ध समाजाचे अध्यक्ष वामन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगे, ग्रामपंचायत सदस्य अनिता शिंगे, रणजीत खोत , मुकुंद पतंगे, बौद्ध समाज बांधव व रेंदाळचे इतर ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी कार्यक्रम घेतल्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा परत सरपंच सुप्रिया भरत पाटील यांनी देखील ग्रामपंचायत सभागृहात फोटो पूजन करून कार्यक्रम संपन्न केला .यावेळी फक्त मोजकेच ग्रामपंचायत सदस्य हजर होते त्यामुळे ग्रामपंचायतला संविधान दिनाचा विसर पडला की काय अशी चर्चा नागरिकांच्या मध्ये होती . नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायत रेंदाळचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

🤙 9921334545