पदाच्या हव्यासापोटीच त्यांना आता ‘बिद्रीचा’ कारभार चुकीचा वाटतो : के. पी. पाटील


बिद्री (प्रतिनिधी): विरोधी आघाडीचा प्रमुख भूमिका बजावणारे माझ्यासोबत दहा वर्षे कारभार पाहत होते. त्यांनी त्या काळात माझ्या कारभाराची स्तुती केली आहे पण हाच कारभार त्यांना आता चुकीचा का वाटू लागला केवळ पदाच्या हव्यासापोटी ते हास्यास्पद बोलत आहेत. असा आरोप माजी आमदार व बिद्री कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी केला.

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यातील तिटवे कपिलेश्वर, आकनुर, मांगोली, तुरंबे, कासारवाडा येथील सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. आमच्या सोबत कारभार करताना त्यांना कारभार चोख वाटला आणि विरोधात गेल्यावर चुकीचा कसा वाटू लागला आहे असा सवाल ही माजी आमदार के. पी. पाटील यांनी यावेळी उपस्थित केला या कारखान्याचे चेअरमन पद स्वीकारले त्या दिवसापासून कारखान्याच्या शेतकरी सभासद कामगार याचाच विचार करून कामकाज केले. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेत याचे तुम्ही साक्षीदार आहात.
यावेळी राजेंद्र पाटील, दीपक किल्लेदार, उमेश भोईटे, धैर्यशील देसाई आदींची भाषणे झाली. रणजीत पाटील, जितेंद्र किल्लेदार, पांडुरंग भोगटे, पांडुरंग गुरव आदी उपस्थित होते.