विरोधकांना चितपट करण्याचा हाच मुहुर्त : आ. सतेज पाटील


बिद्री(प्रतिनिधी) विधानपरिषद निवडणुकीचा मुहुर्त के. पी. पाटील यांनीच काढला होता. ते जाणकार नेतृत्व आहे. आणि आत्ता विरोधकांना चितपट करण्यासाठी त्यांनी योग्य मुहूर्त काढला आहे असा शाब्दिक टोला आ. सतेज पाटील यांनी लगावला. वाघापूर येथील सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे या अडचणीच्या काळात के. पी. पाटील यांनी कारखान्यात योग्य नियोजन केल्यामुळे अवघड काम सोपे करण्याचे महत्त्वाची भूमिका के. पी. पाटील यांनी पार पाडली. त्यामुळे बिद्री साखर कारखाना राज्यात प्रथम क्रमांकाने दर दिला. एफ आर पी बरोबरच नोकर पगार बोनस ही त्यांनी या काळात वेळेत दिला आहे त्यामुळे सर्व घटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आजची सभेची गर्दी पाहता महालक्ष्मी आघाडीचे सर्वच उमेदवार प्रचंड मतांनी विजय होणार याची खात्री आहे. यावेळी बोलताना के. पी. पाटील म्हणाले विरोधकांचा विरोधकांच्या प्रचार सभेत बोलताना दत्तात्रय उगले म्हणतात के. पी. पाटलांचा कारभार हुकुमशाही पद्धतीचा आहे. गैर कारभारामुळे त्यांच्यावर सभासदांचा विश्वास नाही असे असेल तर उगले यांनी आपल्या दिनकरराव नलवडे ग्रामीण पतसंस्थेची दोन कोटीची ठेव बिद्री कारखान्यात कशी ठेवली असा टोला लगावला. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती शेकडो ट्रॅक्टरची प्रचार रॅली व मोटरसायकल रॅली आकर्षक ठरली.