बिद्रीत सभासदांची सत्ता आणण्यासाठी श्री शाहू परिवर्तन आघाडीला विजयी करा – राजे समरजीतसिंह घाटगे 

मुरगूड ( प्रतिनिधी) : गतवेळी सभासदांनी बिद्रीची सत्ता अत्यंत विश्वासाने ज्यांच्याकडे दिली त्या कारभारी मंडळींनी सभासदांच्या विश्वासाशी प्रतारणा करत एकाधिकारशाहीने , व मनमानीपणे कारखान्याचा कारभार केला आहे. त्यामुळे विरोधाला विरोध म्हणून नव्हे तर बिद्रीच्या कारभाराचे विकेंद्रीकरण करून कारखान्यामध्ये सभासदांची सत्ता आणण्यासाठी आपल्या शाहू परिवर्तन आघाडीला विजयी करा असे आवाहन राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.

दुधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज दौलतवाडी, सुरूपली, कुरुकली, हमिदवाडा, शिंदेवाडी, खडकेवाडा, यमगे चिखली गलगले आदी गावांमध्ये आयोजित केलेल्या ऊस उत्पादक सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी श्री.घाटगे म्हणाले, बिद्री कारखाना ही आपली मातृसंस्था आहे .मात्र आजही या मातृसंस्थेमध्ये अद्ययावत ऊस विकास कार्यक्रम आणि माती परीक्षण केंद्र नाही. नियोजनबद्ध तोडणी वाहतूक कार्यक्रम नाही.सभासदांच्या उसाची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात होते ही फार मोठी शोकांतिका आहे. आपली सत्ता आल्यानंतर हे सर्व प्रश्न सोडवण्यास आम्ही प्राधान्य देणार आहोत.

यावेळी बोलताना उमेदवार रणजितसिंह पाटील म्हणाले,विरोधक आमचा कारखाना लई भारी म्हणतात ,मग आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस का नेला जात नाही ? असा सवाल उपस्थित करून सत्ताधारी मंडळींनी या परिसरातील अनेक मयत सभासदांच्या नावावरील शेअर्स जाणीवपूर्वक त्यांच्या वारसांच्या नावे ट्रान्सफार केले नाहीत.

यावेळी दत्तामामा खराडे, सुहास मोरे, समिर मोरे, ज्ञानदेव जाधव, गजानन अस्वले यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित हे उपस्थित होते…

स्व.राजे-मंडलिक साहेबांच्या ध्येयधोरणांचा सत्ताधाऱ्यांना विसर.. 

2005 मध्ये बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्व.राजे-मंडलिक यांनी कारखाना कामकाजा संदर्भात आदर्शवत देहधोरणे घालून दिली होती मात्र सत्तेवर आलेल्या सत्ताधारी मंडळींनी त्यांच्या धोरणांना तिलांजली देत एकाधिकार शाहीने कारभार सुरू ठेवला आहे.त्यांच्या या अनागोंदी कारभाराने बिद्रीच्या ऊस उत्पादक-सभासदांचा ब्रह्मनिरास झाला आहे. आज या निवडणुकीत आपल्या परिवर्तन आघाडीस वाढत असलेला सभासदांचा पाठिंबा त्याचेच द्योतक आहे असे श्री घाटगे म्हणाले.