कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापुरात एल्गार सुरु केला आहे.स्वाभिमानीकडून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तुटलेल्या ऊसातील प्रतिटन 400 रुपयांच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एल्गार सुरु आहे. दरावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून बोलावण्यात आलेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर

हायवेवर चक्काजाम सुरु आहे.
श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी हायवेवर चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी एकटं पाडलं नसल्याचे सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही लढत असताना दखल घेतली नसल्याच ते म्हणाले.स्वाभिमानीकडून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. विरोधी पक्षांनी सुद्धा डोळेझाक केल्याचा आरोप त्यांनी केला. शेट्टी यांनी सर्व कारखाने बंद असल्याचा दावा केला. दुसरीकडे, आंदोलनाची तीव्रता कमी व्हावी म्हणून शिरोळ आणि जयसिंगपूरमधील संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.पोलिसांकडून तगडा बंदोबस्त असून वाहतूक पर्यायी मार्गे वळवली आहे.
यावेळी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं आहे. मात्र, शेतकरी भावांनो मिळेल त्या वाटेने पोलिसांना चुकून महामार्गावर या. सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.