प्रेजेंटेशन सेरेमनीच्यावेळी क्रिकेट प्रेमींची लाजिरवाणी कृती….

नवी दिल्ली : टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार सुरुवात केली होती. प्रत्येक सामन्यात टीम इंडियाने आपल्या प्रदर्शनाचा स्तर उंचावला. अपवाद फक्त फायनलचा. रविवारी अंतिम सामन्यात टीम इंडियाला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भंगलं.

देशभरातील कोट्यावधी क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनलचा सामना झाला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 6 विकेटने हरवून वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे आज प्रत्येक क्रिकेटप्रेमी निराश आहे. पण मॅचनंतर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी एक लाजिरवाणी कृती केली.मोदी स्टेडियममध्ये एक लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत फायनलचा सामना खेळला गेला. टीम इंडियाने फक्त 240 धावा केल्या.

भारतीय फलंदाज चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलण्यात अपयशी ठरले. त्याची किंमत टीम इंडियाला चुकवावी लागली. ऑस्ट्रेलियाने फक्त 4 विकेट गमावून आरामात विजयी लक्ष्य गाठलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.कॅटलबरो यांच्या नावाचा पुकार होताच हूटिंगया पराभवाने खेळाडूंसह स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या 1 लाख प्रेक्षकांनाही निराश केलं.

मॅचनंतर प्रेजेंटेशन सेरेमनीच्यावेळी अर्ध स्टेडियम रिकामी होतं. आपल्या खेळाडूंचा सन्मान होईपर्यंत काही फॅन्स थांबले होते. पण त्यात काही असे सुद्धा होते, ज्यांनी आपल्या कृतीने टीम इंडियाचा अपमान केला. प्रेजेंटेशन सेरेमनीच्यावेळी सर्वातआधी मॅचचे अंपायर्स आणि रेफरीला मेडल देण्यात आलं. फायनल मॅचचे ऑन फिल्ड अंपायर रिचर्ड कॅटलबरो यांच्या नावाचा पुकार होताच प्रेक्षकांनी हूटिंग सुरु केली. रिचर्ड कॅटलबरो हे टीम इंडियासाठी अनलकी तर ऑस्ट्रेलियासाठी लकी ठरतात अशी धारणा आहे.दोघांच नाव पुकारताच पुन्हा अशीच कृतीफक्त अंपायरच नाही, प्रेक्षकांनी टीम इंडियाच्या दोन खेळाडूंच्या नावाचा पुकार होताच पुन्हा अशीच कृती केली.

टीम इंडियातील बहुतांश खेळाडूंना मेडल देत असताना प्रेक्षकांनी उत्साह वाढवला. पण केएल राहुलच्या नावाचा पुकार होताच हूटिंग सुरु केलं. फक्त राहुलच नाही, सूर्यकुमार यादवच नाव पुकारताच अशीच कृती केली. हूटिंग म्हणजे एकप्रकारे तिरस्काराचे सूर. केएल राहुलने 107 चेंडूत 66 धावा करताना एक चौकार मारला. सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत फक्त 18 धावा केल्या.