गडहिंग्लज(प्रतिनिधी) बारा बलुतेदारांना व्यवसायिक प्रशिक्षण व व्यवसायाच्या आर्थिक मदतीसाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ‘ही नाविन्यपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या योजनेचा कॅम्प समरजितसिंह आपल्या दारी उपक्रमांतर्गत गडहिंग्लजमध्ये घेतला आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात सहकारमहर्षी स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त 'चला संकल्प करुया ७५हजार लाभार्यांना लाभ देऊया' उपक्रमांतर्गत 'समरजितसिंह आपल्या दारी' अभियान अंतर्गत पाचव्या कँपच्या शुभारंभवेळी ते बोलत होते.यावेळी विविध योजनांच्या लाभासाठी १३९६ लाभार्थ्यांनी नोंदणी केली.
यावेळी त्यांनी शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे व साहित्याचे वाटपही केले.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, शासनाच्या योजनांपासून वंचित लोकांनी नेत्यांच्या दारात जायचे नाही तर नेत्यांनी अशा लोकांच्या दारात जाण्यासाठीच राज्यात सर्वप्रथम समरजितसिंह आपल्या दारी अभिनव उपक्रम राबविला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना त्यांच्या दारात जाऊन दिला आहे.त्यामुळे कागल-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ देताना गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु असलेली एजंटगिरी मोडून काढली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे म्हणाले, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाश्वत विकास कामाच्या माध्यमातून सर्वसमान्यांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले.त्यांना गुरुस्थानी मानून त्यांच्याच कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजे समरजितसिंह घाटगे गट-तट न पाहता कार्यरत आहेत.त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी देऊया.
यावेळी आण्णासाहेब पाटील,अनिता चौगुले, गणपतराव डोंगरे, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील,सरपंच अनुप पाटील,परमेश्वरी पाटील,शाहूचे संचालक सचिन मगदूम, प्रीतम कापसे,सुदर्शन चव्हाण,रविंद्र घोरपडे,शैलेश कावणेकर,भिमराव कोमारे,शहाजी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मी पोवार,बाळासो पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी केले.अजित जामदार यांनी प्रास्तविक केले.आभार संग्राम आसबे यांनी मानले
राजेंच्यामुळे स्वतःच्या पायावर उभा
यावेळी अत्याळ येथील दिव्यांग लाभार्थी बाळासाहेब पाटील यांनी समरजीतसिंह घाटगे यांनी माझ्या घरी कार्यकर्ते पाठवून मला जयपुर फुट उपलब्ध करून दिला. त्यासाठी एक रुपयाही कुणाला द्यावा लागला नाही.त्यामुळे मेकॅनिक म्हणून काम करीत असून स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो. असे कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले.