डॉ.शंकर अंदानी यांचे पोस्टल स्टँप प्रसारीत

अहमदनगर : अहमदनगर मधील प्रख्यात सी.ए.,सामाजिक कार्यकर्ते डॉ.शंकर अंदानी यांचे नुकतेच पोस्टल स्टँप प्रसारित करण्यात आले आहे. तसेच नुकताच त्यांच्या अत्यंत उत्कृष्ट सेवेबद्दल दिला जाणाराअशोका पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला आहे. तसेच डॉ.अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड झाली आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी डॉ.अंदानी यांची निवड झाली आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या गौरवास्पद कामामुळे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान,सन्मान, पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांचे स्टँप तिकीट प्रसारित झाल्याने डॉ.शंकर अंदानी यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.