कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष व जनता दल यांच्या संयुक्त आघाडीचा प्रचार शुभारंभ हसुर दुमाला ता .करवीर येथे उद्या (रविवार) दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वानऊ वाजता होणार आहे .

हसुर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या आवारात हा प्रचार शुभारंभ होणार आहे यावेळी या आघाडीचे नेते भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन आमदार पी एन पाटील सडोलीकर शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील गोकुळदूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील कंथेवाडीकर या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार शुभारंभ होणार आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन कृष्णराव किरुळकर गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी डी धुंदरे कारखान्याचे व्हाईस चेअरमन उदयसिंह पाटील कौलवकरशेतकरी कामगार पक्षाची युवा नेते क्रांतीसिंह पवार पाटीलयांच्यासह सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात काँग्रेस पक्ष व त्यांचा पारंपारिक प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जनता दल एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून या प्रचार शुभारंभ सभेच्या निमित्ताने कार्यकर्ते चार्ज होणार आहेत .त्यामुळे ही सभा उच्चांकी होणार आहे या सभेला सर्वांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे .