प्रा. जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन.

कोल्हापूर (प्रतिनिधी) सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रा.नामदेवराव जाधव हे सतत सामाजिक शांतता भंग करणारे वक्तव्य करत असून त्यांच्या बेताल चिथावणी खोर वक्तव्यामुळे मराठी तरुणांची माथी भडकण्याचा व समाजात जातीय तेढ उद्भवण्याची शक्यता आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व शहराध्यक्ष आर.के.पवार यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना निवेदन दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, महिला, सरचिटणीस सुनील देसाई ,कार्याध्यक्ष अनिल घाटगे , उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव, दक्षिण विधानसभा अध्यक्ष नितीनभाऊ पाटील, फिरोज सरगूर, महादेव पाटील विद्यार्थी अध्यक्ष गणेश नलवडे, युवक अध्यक्ष निलेश मछले, राजेंद्र ओमकार, हिदायत मनेर सुनील सावर्डेकर, सादिक अत्तार, श्रीकांत पाटील, पंडित कळके, परेश टिपुगडे, दिनकर धोंदडे, सुरज कोराणे, दीक्षांत अभंगे, संदीप घाटगे, फिरोज खान उस्ताद आदीसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545