कोल्हापूर: १७ नोव्हेंबर ला मनोज जरांगे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापूर दौऱ्यात ते विविध मान्यवरांची भेट घेणार आहेत. कोल्हापूर येथे जारांगे पाटलांची भव्य सभा होईल आणि या सभेसाठी जागा निश्चित करण्याचे काम येथील सकल मराठा समाजातर्फे केले जात आहे.

जरांगे-पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत होत आहे. दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. मराठा आरक्षणासाठी रान पेटवले आहे. ते पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहेत. त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात येणार आहे. त्याची तयारी केली जात आहे. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील यांना राज्यभरातूनत्यांना सभा घेण्यासाठी आमंत्रित केले जात असल्याने जरांगे-पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून २३ नोव्हेंबर पर्यंत राज्यात संपर्क दौरा करण्याची घोषणा केली. दौऱ्यासाठी कोणी पैसे देवू नका आम्ही पैसे घेत नाही आणि आंदोलनाला डाग लाऊ नका असे आवाहन मनोज जरांगे – पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच १ डिसेंबर पासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले.