कोल्हापूर (प्रतिनिधी) अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन 8 नोव्हेंबर( बुधवार) रोजी होणार आहे. सदरचे समायोजन पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने कोणीही आमिषाला बळी पडू नये असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.

संच मान्यता - २०२२-२३ नुसार कोल्हापूर जिल्ह्यातील अतिरिक्त झालेल्या अनुदानित व टप्पा अनुदानित शाळांमधील माध्यमिक शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत.
संच मान्यता कॅम्प माहे - जुलै २०२३ मध्ये तालुकानिहाय लावून एच फॉर्म तयार करण्यात आला होता. या एच फॉर्म मध्ये शाळानिहाय मंजूर, रिक्त व अतिरिक्त शिक्षकांची माहिती अध्यापन स्तर निहाय तयार करण्यात आली. पायाभूत संच मान्यता, सन - २०२२-२३ ची संच मान्यता, शाळांचे पगार पत्रक व रोस्टर पाहून माहिती तयार करण्यात आली.
एच फॉर्म मधील माहिती हरकतीसाठी प्रसिद्ध करण्यात आली. प्राप्त हरकती अन्वये त्यात सुधारणा करणेत आली. या माहितीच्या आधारे शाळा व संस्था स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबत शाळा व संस्थांना दिनांक २९ ऑगस्ट २०२३ च्या पत्रानुसार सांगण्यात आले होते.
ज्या अतिरिक्त शिक्षकांचे संस्था स्तरावर समायोजन झालेले नाही अशा शिक्षकांचे समायोजन जिल्हा स्तरावर करण्यासाठी संस्था व शाळांकडून विहित नमुन्यात माहिती मागविण्यात आली. प्राप्त माहितीनुसार अतिरिक्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी व रिक्त पदांची माहिती दिनांक २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करून दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकतींवर दिनांक १ व 3 नोव्हेंबर २०२३ रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या समक्ष सुनावणी ठेवण्यात आली होती. संस्था चालक, मुख्याध्यापक व हरकत घेणारे शिक्षक यांना बोलावून सुनावणीमध्ये प्रत्यक्ष अभिलेखे ( संच मान्यता, सेवा ज्येष्ठता यादी, रोस्टर ) पाहून हरकतींवर निर्णय घेऊन अतिरिक्त शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी तसेच रिक्त पदांची ही यादी अंतिम करण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांच्या हरकती २२ प्राप्त त्यापैकी १२ हरकती मान्य करण्यात आल्या, रिक्त पदांच्या ५६ प्राप्त त्यापैकी २ हरकती मान्य करण्यात आल्या.
सर्व शैक्षणिक संस्था चालकांची २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी आमदार जयंत असगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना मीटिंगमध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी अतिरिक्त शिक्षक कामकाज बद्दल माहिती देण्यात आली. 27 ऑक्टोंबर 2023 रोजी जिल्हयातील सर्व मुख्याध्यापक यांची ऑनलाइन मीटिंग घेऊन समायोजन कामकाज बद्दल अवगत करण्यात आले.
प्राप्त हरकतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 100% व अंशतः अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षक संख्या - अनुदानित -४६
६०% – ०४
४०% – ०१ अंतिम झालेली आहे.तसेच प्राप्त हरकती नंतर रिक्त पदांची स्तरनिहाय संख्या इयत्ता ५ वी – ८०, इयत्ता ६ वी ते ८ वी- ३१८, ९ ते १० – ३४१ – एकूण : ७४०
60% अनुदानित स्तरनिहाय रिक्त संख्या-इयत्ता ५ वी -०२, इयत्ता ६ ते ८ वी – ०२, इयत्ता ९ वी ते १० वी -०८ अंतिम करण्यात आलेली आहे.
अतिरिक्त शिक्षक व रिक्त पदांची अंतिम यादी नुसार बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ रोजी न्यू कॉलेज येथे समुपदेशनाचे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे. ही शिक्षक समायोजन सर्व प्रक्रिया इन कॅमेरा मध्ये होणार आहे. या समायोजनासाठी आमदार जयंत असगावकर जिल्हाधिकारी राहुल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, उपस्थित राहणार आहेत.
तसेच माध्यम प्रतिनिधी यांच्या उपस्थिती मध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशनाने समायोजन अतिशय पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. असे ही शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर, यांनी सांगितले.
