कागल (प्रतिनिधी) : कागलची भूमी ही छत्रपती शाहू महाराजांच्या अफाट कर्तृत्वाची देन आहे. काहीनी कागल ची ओळख राजकीय विद्यापीठ म्हणून केली आहे हे भूषणावह नाही. राजे समरजीतसिंह घाटगे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सामाजभिमुख कार्याची वाटचाल पाहता भविष्यात कागल ची ओळख पुर्ववत ” शाहूंचे कागल” अशीच होईल.असा ठाम विश्वास ज्येष्ठ साहित्यिक राम देशपांडे यांनी व्यक्त केला.
येथे आयोजित केलेल्या शाहू लोकरंग महोत्सवात शाहू पुरस्कार प्रधान कार्यक्रमात ते बोलत होते. जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना यावर्षी पासून सुरू केलेला पहिलाच लोकराजा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार 2023 हजारोंच्या साक्षीने शाहू उद्योग समूहाच्या वतीने प्रदान करण्यात आला. डॉ.प्रकाश आमटे यांच्या प्रकृत्ती अस्वस्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.त्यांच्या वतीने त्यांचे निकटवर्तीय साहित्यिक राम देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
व्यासपीठावर यावेळी शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, खासदार धनंजय महाडिक
नंदितादेवी घाटगे , विरेंद्रराजे घाटगे ,श्रेयादेवी घाटगे, आरपीआयचे उत्तम दादा कांबळे, उपस्थित होते.
यावेळी बोलताना साहित्यिक देशपांडे म्हणाले, सर्वसामान्यांचे जीवनमान सर्वच पातळीवर उंचावण्यासाठी आज समरजितराजे राजकारणविरहित काम करीत आहेत.कागलच्या घाटगे घराण्याचे सामाजिक कर्तुत्वही मोठ्या उंचीचे आहे.ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे,प्रकाश आमटे यांचे कागलच्या घाटगे घराण्याशी जुने ऋणानुबंध आहेत. हा मोठा अमृतयोग म्हणावा लागेल.आज हेच ऋणानुबंध या पुरस्काराच्या माध्यमातून राजे समरजीतसिंह घाटगे अधिक दृढ करत आहेत याचा आज मनस्वी आनंद होत आहे.
यावेळी बोलताना खास. धनंजय महाडिक म्हणाले, स्वर्गीय राजेंच्या पश्चात राजे समरजीतसिंह घाटगे यांनी शाहू ग्रुपची वाटचाल अत्यंत सक्षमपणे चालवली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजे बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.मराठा समाजाला स्वबळावर उभारण्याच्या त्यांच्या कामाचे आज सर्वत्र कौतुक होत आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यावेळी बोलताना म्हणाले,कागल येथील श्रीराम मंदिराची संकल्पना स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी मांडली.मात्र येथील जनतेच्या पुढाकारानेच मंदिर उभारणीचे काम पूर्णत्वास गेले आहे . येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिरामध्ये नियोजित सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कागल येथील श्रीराम मंदिरामध्ये देखील याच दरम्यान सलग तीन दिवस भरगच्च हा सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याने कागलमध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल. हा या पाठीमागे उद्देश आहे
यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,पद्माराजे पटवर्धन, भाजपाचे सरचिटणीस नाथाजी पाटील,सुशिला पाटील,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे,राजे बॅंकेचे चेअरमन एम.पी.पाटील,उपाध्यक्ष नंदकुमार माळकर,कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, शाहू कारखान्याचे सर्व संचालकासह , शाहू गृपच्या सर्वच संस्थांचे संचालक ,पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र.....
ज्येष्ठ साहित्यिक राम देशपांडे यांना राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे.सोबत खास.धनंजय महाडिक,शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, वीरेंद्रराजे घाटगे.
” आनंदवन” आणि “हेमलकसा” तीर्थक्षेत्रेच…
डॉक्टर आमटे परिवारांच्या कर्तृत्वाबद्दल बोलताना राम देशपांडे म्हणाले, आपण श्रीक्षेत्र पंढरपूरला तीर्थक्षेत्र मानतो,परुंतू कुष्ठरोग्यासाठी आनंदवन आणि आदिवासींच्या साठी हेमलकसा ही सर्वांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येत आहेत एक वेळ या तीर्थक्षेत्रांना अवश्य भेट द्या