बिद्री कारखाना निवडणुक ; विविध गटातील 42 अर्ज अपात्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी विविध गटात ८६२ उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अपात्र अर्जांची दिवसभर व रात्री उशिरापर्यंत छाननी सुरु होती. शुक्रवारी (दि. ३) ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.

छाननीनंतर विविध गटातील ४२ अर्ज अपात्र झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी सांगितले.
‘बिद्री’ निवडणुकीसाठी २६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याससुरूवात होवून १ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. गुरुवारी छाननी करण्यात आली.

दिवसभर चाललेल्या छाननीत कारखान्याच्या उपनिधीनुसार नामनिर्देश अर्जांची पडताळणी करण्यात आली. या छाननीत ५ पैकी किमान ३ हंगामात ऊस पुरवठा नाही, सभासद शेअर्स रक्कम थकबाकी असणे, गटाच्या मतदार यादीत नाव नसणे, चुकीचे अनुक्रमांक,सुचक, अनुमोदक यांची शेअर्स रक्कम भकबाकी व सह्या नसणे, अशा कारणामुळे ४२ अर्ज अपात्र ठरले आहेत.

या छाननीवेळी गटनेते, बहुसंख्य
उमेदवार, वकीलांची फौज उपस्थित होती. गटनेत्यांनी अर्जावर फारसाआक्षेप न घेता सबुरी घेतली होती. विद्यमान संचालक मंडळ शाबूत असूनअर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.दीपावलीच्या सुट्या वगळता माघारीसाठी केवळ सात दिवस मिळणार आहेत. नेत्यांना माघारीसाठी विनवणी कराव्या लागणार आहे.
१७ नोव्हेंबरला पॅनेल रचना होईल आणि १८ नोव्हेंबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. ३ डिसेंबरला मतदान होणार असून ५ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.