जरांगेच्या पाठिंब्यासाठी खुपिरेत कँडल मोर्चा..

दोनवडे प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील खुपिरे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे.आज मराठा बांधवांनी एकत्र येऊन गावातून कँडल मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मर्दानी खेळ हे कँडल मोर्चाचे आकर्षक ठरले.जय भवानी जय शिवाजी ,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ,जरांगे पाटील तुम आज बढो हम तुम्हारे साथ है आशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मारुती मंदिरापासून सूर झालेली हि रॅली गुजा पाटील गल्ली ते खुपिरे मुख्य रस्त्या पासून गावातून येऊन मारुती मंदिरा समोर रॅलीची सांगता करण्यात आली.

यावेळी सरपंच तृप्ती पाटील ,उपसरपंच सागर पाटील माजी उपसरपंच युवराज पाटील ,अर्जुन पाटील (गवळी) ,युवराज पाटील सर,एकनाथ जगदाळे सर, कुंडलीक केंबळेकर,बबलू पाटील, नाथा पाटील , सरदार पाटील (नरसू), शिवाजी जाधव, हिंदूराव गुरव, उदय पाटील , पांडूरंग शिंदे, संताजी पाटील,प्रकाश रेवडे ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने सहभागी होते.

🤙 9921334545