….तर आम्ही चर्चेचे दरवाजे यापुढे बंद करू : राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : गेल्या वर्षीच्या ऊस दरातील चारशे रुपयेचा फरक देण्याकरिता साखर कारखाने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झालेली बैठक फिस्कटली. चर्चेच गुऱ्हाळ सुरू ठेवून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास, संघर्ष अटळ आहे. आम्ही चर्चेचे दरवाजे यापुढे बंद करू , असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. बैठकीनंतर माजी खासदार शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.

गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्या. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेन केली आहे. या मागणीकरिता गळीत हंगाम सुरू करू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेन दिलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीन आक्रमक आंदोलन करण्यात येत असून ऊस आणि साखरेची वाहतूक देखील आडविण्यात येत आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची समन्वय बैठक जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारीी कार्यालयात संपन्न झाली. साखर कारखानदार आणिि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही दुसरी बैठक होती. मात्र ही बैठक देखील निष्फळ ठरली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक या बैठकीसाठी उपस्थित होते.

या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना माजी खासदार शेेट्टी यांनी बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचं सांगितलं. मात्र, 400 रुपयाच्या मागणीला आम्ही चिकटून नाही. एक पाऊल मागे घेण्याची आमची तयारी असून साखर कारखान्यानी देखील त्याबाबतची तयारी दाखवावी. अस आवाहनही या बैठकीत केल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. मात्र यावर साखर कारखान्यांच्या चेअरमन यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याबाबत कार्यकारी संचालक यांनी बैठकीत आश्वासन दिलय.

गेल्या वर्षभरात देशांतर्गत तसच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला भाव मिळत आहे.मार्चनंतर विक्री झालेल्या साखरेला किमान ३८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.. कारखान्यांनी इथेनॉल मधून देखील चांगला आर्थिक नफा मिळवला आहे.. त्याचबरोबर, वीज आणि अन्य उपपदार्थांच्या माध्यमातूनही साखर कारखान्यांची कमाई केली आहे. कारखान्यांना मिळालेल्या अतिरिक्त नफ्यातून शेतकऱ्यांचा हक्काचा वाटा मागत आहोत. केवळ
चर्चेच गुऱ्हाळ सुरू ठेवून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास, संघर्ष अटळ आहे. आम्ही चर्चेचे दरवाजे यापुढे बंद करू ,असा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

या बैठकीवेळी, साखर सहसंचालक डॉक्टर अशोक गाडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक , यांच्यासह जिल्ह्यातील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक , एडवोकेट माणिक शिंदे , विविध संघटनांचे प्रतिनिधी ऊपस्थित होते.

🤙 9921334545