रेंदाळ येथे मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा,मोटर सायकल रॅली व निषेध सभा

हातकणंगले: रेंदाळ तालुका हातकणंगले येथे मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून संविधानिक मार्गाने उपोषण करणाऱ्या जालना जिल्ह्यतील आंतरवाली सराटी या गावी मनोज जरांगे पाटील त्यांच्या समर्थनार्थ रेंदाळ येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी एस टी स्टँड रेंदाळ इथून मराठा समाजाच्या जनजागृतीसाठी मोटर सायकल रॅली काढण्यात आली.

मराठा समाजावरती अन्याय करणाऱ्या व आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाचा निषेध सभा घेऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आणि समस्त रेंदाळकर नागरिकांच्या वतीने राजकीय लोकांना गावात येण्यास मज्जाव करण्यासाठी आमदार, खासदार ,मंत्री, व राज्यकर्ते कारभारी यांना गावबंदी या आशयाचा रेंदाळ एसटी स्टँड येथे बोर्ड उभारण्यात आला मराठा समाज आरक्षणासाठी गावातील मुस्लिम समाज ,धनगर समाज बौध्द समाज व गावातील इतर समाज आणि ग्रामपंचायत रेंदाळ यांच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

आंदोलनकर्त्यांच्या मध्ये आंदोलनाची पुढील दिशा म्हणून मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पासून रेंदाळ एसटी स्टँड येथे लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा एकमुखी ठराव सभेत पास करण्यात आला.

यावेळी मराठा समाज रेंदाळचे कार्याध्यक्ष सूर्याजी भोसले अध्यक्ष बी. एम. पाटील ,उपाध्यक्ष अरविंद खानविलकर, उपाध्यक्ष राजू मुधाळकर , खजिनदार सुरेश इंगळे ,
सचिव विजय मोहिते , सहसचिव परशराम हवालदार , प्रसिद्धी प्रमुख रामदास पाटील, समन्वयक अमृत करडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडेस्वार , रणजीत खोत गजानन वाईगडें, शिवाजीराव पाटील , महिपतराव पाटील,दत्तात्रय पाटील ,तानाजी पाटील,धवल पाटील,धनाजी करवते,सचिन मेथे,विनोद पाटील ,शामराव पाटील,सुनील करडे, चंद्रकात करडे, संदीप करडे,पोपट पाटील.
सामाजिक कार्यकर्ते भरत इंगळे पाटील , प्रशांत मिठारी , किरण वाळके,कृष्णात पुजारी ,सरताज नायकवडे,भगवान कांबळे,विकास पुजारी,वामन कांबळे,मन्सूर नाईकवाडे, संजय चौगुले, व समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.