शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध : डॉ.एकनाथ आंबोकर

कोल्हापूर( प्रतिनिधी) शैक्षणिक क्षेत्रात कालबद्ध पदोन्नती, अर्धवेळ शिक्षकांच्या उद्भवणाऱ्या समस्या, शैक्षणिक काम निकोप वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षकांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक पे संघटना सहविचार सभा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ येथील सभागृहामध्ये झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातील – माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक संघटनांचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी उपस्थित होते.

सीएचबी काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी स्लिप वितरित करणे, वेळेत देणे, शाळांचे अनुदान वेळेत मिळावे, ऑनलाइन माहिती यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) भरताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात प्रशिक्षण घेणे, पेन्शन पेपरवरती शिक्षणाधिकारी यांच्या सह्या करणे, युनिटमधील कर्मचाऱ्यांकडून आणि माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिकांकडून योग्य वागणूक मिळावी. 

अन्य शाळांकडून आलेल्या विद्यार्थ्यांची विनंती स्वीकारणे, विविध शिष्यवृत्तीच्या मागणीच्या प्रस्तावांची परिपत्रके १५ दिवस अगोदर पाठवीत, न्यू टॅब वेळ वाढवून द्यावी, शिक्षा निधीबाबत, शैक्षणिक सहलीची परवानगीबरोबरच खेळाडूंसाठी बसेस परवानगी मिळणे, तसेच ग्रंथपालांच्या समस्येबाबत कॅम्प लावणे, आदी विषयांवर या सभेमध्ये चर्चा झाली.

यावेळी अनुराधा म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, एस. डी. लाड, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, व्ही. जी. पोवार, डॉ. डी. एस. घुगरे, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, आर. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, उदय पाटील, अधीक्षक प्रवीण फाटक, विस्तार अधिकारी डी. एल. पाटील, जयश्री जाधव, रत्नप्रभा दबडे, विश्वास सुतार, दगडू कुंभार, नीलेश म्हाळुंगेकर, नितीन खाडे, कल्पना पाटील, आदी उपस्थित होते.