कुडित्रे येथे कॅडल मार्च…

कुडित्रे : सकल मराठा समाज कुडित्रे यांच्या मार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी तसेच मनोज जरांगे - पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गांवातून कॅडल मार्च काढण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. आरक्षणाच्या मुद्दयावर समाज आग्रही असून ते मिळेपर्यत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच यावेळी झालेल्या सभेत आरर्क्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यत सर्वपक्षीय नेत्यांना गांवबंदी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. तसा फलक गांवाच्या वेशीवर लावण्यात येणार आहे.

याप्रसंगी प्रा. बाजीराव पाटील,शरद नलवडे,सुनिल पाटील(सर),विष्णु राऊत यांची भाषणे झालीत. आभार उपसरपंच अजित पाटील यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजाराम कदम,तुकाराम शेलार, सरदार पाटील,बबन चौगले, आनंदा पाटील,बाळ पाटील,सरदार मुल्लाणी,युवराज पाटील,जालींदर पाटील,दादा पाटील,कर्तार पाटील,टी ए शेलार,सदाशिव शेलार,तानाजी शेलार,धीरज पाटील,गुणाजी शेलार,नामदेव भास्कर,बळीराम पाटील आदि कार्यकर्त उपस्थित होते.