दोनवडे प्रतिनिधी:मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय करवीर तालुक्यातील खुपिरे येथे रविवारी रात्री झालेल्या सभेत घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच तृप्ती संजय पाटील होत्या.यावेळी गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी बरोबरच गावातील त्यांचे डिजिटल बोर्डही काढण्याचा निर्णय झाला. यावेळी मराठा आरक्षणास देण्यात येणाऱ्या दिरंगाई बाबत युवकातून शासनाविरोधी भावना व्यक्त करण्यात आल्या. मारुती देवालयाच्या समोरील पटांगणात ही सभा घेण्यात आली.
सभेत मराठा आरक्षणास विरोध करणारे गुणवर्त सदावर्ते यांच्या निषेधाचा ठराव घेण्यात आला.या सभेसाठी ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युवराज पाटील सर,एकनाथ जगदाळे सर,संजय पाटील सर,प्रल्हाद पाटील, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पांडुरंग शिंदे, बळीराम पाटील यांची भाषणे झालीत.उपसरपंच सागर पाटील, दत्त विकास संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष आनंदा कृष्णा पाटील ,बलभीम विकास संस्थेचे अध्यक्ष राऊ चौगले,संजय सखाराम पाटील आदी संस्थांचे पदाधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
