मराठा आरक्षणासाठी साबळेवाडी सदस्याने दिला राजीनामा

दोनवडे प्रतिनिधी:मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मनोज जरंगे पाटील यांनी रान उठवले आहे. नेत्यांना गावबंदी, मोर्चे याप्रकारची तीव्र आंदोलने सुरू आहेत. याच धर्तीवर करवीर तालुक्यातील माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य नामदेव बलवंत पाटील यांनी आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा देऊन मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात झालेल्या सकल मराठा समितीच्या बैठकीवेळी त्यांनी हा राजीनामा दिला सोमवारी ते आपला राजीनामा जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देणारे पाटील हे पहिले सदस्य असावेत.मराठा समाजावर होत असलेला अन्याय पाहत नसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

🤙 9921334545