पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक ; ममता बॅनर्जी यांना धक्का

कोलकाता : स्वस्त धान्य वितरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा चौकशीअंती पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे.

ईडी’चे पथक गुरुवारी सकाळी या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात कोलकात्यातील सॉल्ट लेक परिसरातील मलिक यांच्या घरी थडकले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मलिक यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मलिक यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाईमुळे ममता बॅनर्जी संतापल्या होत्या. चौकशीदरम्यान मलिक यांना काही झाल्यास भाजप आणि ‘ईडी’च्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

🤙 9921334545